पहिलं प्रेम - " सायलीचा वाढदिवस ; विनय साठी खास " भाग ३

 मैत्रिदिन आनंदात पार पडले. विनय सायलीच्या प्रेमात पडू लागला होता. त्याला ती आवडायला लागली होती. पण तिला हे सांगावं कस हे त्याला समजत न्हवत, ह्या आधी ह्या गोष्टी वरून विनय नकार देत असल्यामुळे त्याला तिला विचारायला कस तरी वाटत होतं. तेव्हा त्याला समजते की सायलीचा वाढदिवस येणार आहे. तो ठरवतो मी त्या दिवशी तिला लग्नासाठी मागणी घालेन.

तो सायलीच्या वाढदिवसाची तयारी जोरात चालू करतो. मूवी बघायला जायचं, तिथून हॉटेल मध्ये जेवायला जायचे, आणि मग तिथून मरीन ड्राईव्ह ला जाऊन तिला ह्या बद्दल विचारायचं अस तयारी तो करतो.

सायली ला तो बोलतो तुज्या वाढदिवसाच्या दिवशी तू तुझा पूर्ण दिवस माझ्यासोबत घालवशील का? त्यावर सायली क्षणातच होकार देते जणू काही ती ह्या गोष्टीची वाटच बघत होती.

विनय खूप आनंदात असतो. सारख डोक्यामध्ये एकच विचार येत असतो, कपडे कोणते घालू, शूज कोणते घालू, गाडी नेऊ की बाईक नेऊ, प्रपोज कस करू, आधी काय बोलू?
आणि दुसरी कडे सायलीचं देखील सारखच चालू होतं, मी विनय ला माझ्या वाढदिवासचं गिफ्ट म्हणून त्याच हृदय मागेन, म्हणजे पुन्हा त्याला विचारेन. मला आशा आहे ह्या वेळेस तो नक्की हो बोलेल अस तिला वाटत होतं. आणि ते खरं देखील होणार होत पण!

सायलीच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी कंपनीच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर सायलीचा मेसज आला की " आज काही महत्वाच्या कामानिम्मित मला आज ऑफिस ला येता येणार नाही" विनय त्यावर ओके अस रिप्लाय देतो. त्याला तर उद्याच्या दिवसाची म्हणजे सायलीच्या वाढदिवसाची घाई होती.
तो दिवस आला विनय खुप तयार होत होता व आनंदात देखील होता. त्यावर त्याला घरचे सारखे विचारत होते कोणत्या मुलीला भेटायला जतोयस का ? खूप आनंदात आहेस . आज काही आहे का ? विनय काहीच बोलत न्हवता. त्याच्या चेऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगत होता.
सायली पण तयार होऊन ठरलेल्या ठिकाणी जाऊन विनय ची वाट बघत होती. विनय तिथे पोहचला आणि सर्वात आधी सायली ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर सायली थँक्स बोलून शांत होते. हे खूप विचीत्र होत पण विनय समजून घेतो व ते मस्त रोमँटिक मूवी बघायला जातात. सायली खूप उदास असते. त्या नंतर ते दोघे जेवायला हॉटेल मध्ये जातात त्यावर सायली नकार देते. मला नाही काही खायचं, आपण कुठे तरी शांत ठिकाणी जाऊया का? तो म्हणाला होय चालेल! आपण जाऊ. विनय मनातल्यामनात आता हिला विचारतो म्हणजे ही च ती वेळ आहे.

एका शांत ठिकाणी बसल्यावर कोणीच काही बोलत न्हवत. विनय वाट बघत होता की ही काही बोलेल म्हणून . शेवटी सायली विनय ला बोलते मला तुमच्याशी बोलायचे आहे. होय बोल ना. माझं तुमच्या वर खूप प्रेम आहे. मी गोव्याला असताना तुम्हला ह्या बद्दल विचारलं होत, पण तुम्ही त्या वेळेस नकार दिलात. पण आता कदाचित मी तुम्हाला नाही बोलू शकत की माझं तुमच्या वर प्रेम आहे. तो पटकन बोलतो का? काय झालं ? मी तुला आज हेच बोलणार होतो. तू माझ्याशी लग्न करशील का?
सायली च्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले आणि ती रडत रडत बोलली माझ्या घरच्यांनी माझं काल लग्न ठरवलं आहे. काल मला बघायला एक मुलगा आला होता. पण माझं प्रेम तुमच्या वर आहे. मी नाही त्याच्या सोबत राहू शकत.
विनय ह्या वर निःशब्द होतो. सायलीचा हात हातात घेऊन बोलतो तू घरच्यांचा विरोधात नको जाऊ तू कर त्या मुला सोबत लग्न. त्याला देखील रडू येत होतं पण त्याने तस नाही दाखवलं. ती मात्र त्याला घट्ट मिठी मारून मन मोकळं करून रडत होती. जस काय तिला पुढे काहीच दिसत न्हवत.

" अस गोड प्रेमाची सुरवात होता होता ते अपूर्ण राहिले "



पुढील भाग ४  - " विनयचा घाणेरडा भूतकाळ "  लवकरच....


( पुढील भाग लवकरच पोस्ट केला जाईल त्यासाठी आम्हाला फोल्लो करा )
Instagram - https://www.instagram.com/sahebraav291/
Printest -     https://pin.it/7AT1QJ3

( ह्या ब्लॉग चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत , कोणीही परवानगी शिवाय ही कथा वापरू नये )

(All rights reserved to this blog, no one should use this story without permission)

For Permission Contact us : sahebraav291@gmail.com

परवानगी साठी संपर्क करा :  sahebraav291@gmail.com


लेखक ✍️ :  साहेबराव......






  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पहिलं प्रेम - एकतर्फी प्रेमाचे मैत्रीत रूपांतर भाग २

 पहिला भाग वाचा -  भाग १

 गोव्याला गेल्यावर सायली ने विनय ला प्रेमाची मागणी घातली , विनयला ते आवडलं नाही म्हणून तो तिथून निघून गेला.

सकाळ झाली, सर्व जण बस मध्ये बसून पुन्हा मुंबई कडे रवाना झाले. बस मध्ये बाकी सर्व जण गाण्यांच्या भेंड्या खेळत होते फक्त सायली व विनय सोडून. असच खेळता खेळता सर्व जण  सायली ला बोलतात, आता तू गा गाणं, त्यावर सायली पूर्णपणे नकार देते पण सर्वांच्या हट्टामुळे सायली ला 'म' वरून गाणं गायचं असत. सायली खुप विचार करून एक गाणं गायाला तयार होते. प्रेमळ नजरेने विनय कडे पाहत म्हणते " मुझसे मोहब्बत का इज़हार करता ; काश कोई लड़का मुझे प्यार करता ". अस गाणं ऐकल्यावर विनय ला आजून खूप राग येत होता. विनय घरी पोहचला, घरात आधीच त्याची मोठी ताई व तिची मोठी मुलगी आली होती २ दिवसाकरता, विनय च्या मनात सायली बद्दल सारखे विचार येत होते. कदाचित त्याला पण ती आवडते, पण तो तस दाखवत न्हवता. काहीच न बोलता विनय झोपला. सारखा सायली बद्दल मनात मध्ये विचार चालु होते. असे त्याला ह्या आधी खूप purpose आले होते, पण ह्या वेळेस विनयला ह्या सायली बद्दल खूप त्रास होत होता.

सायली चीही परिस्थिती विनय सारखी होती, ती पण खूप शांत शांत होती. जास्त बोलत न्हवती, सारखा विनय बद्दल विचार चालू होता मनामध्ये. पण तिला विनय पाहिजे होता, मनातल्या मनात रडवेली झाली होती.

- बघता बघता ६ महिने निघून गेले होते -

विनय सायली ला पूर्णपणे विसरला होता, पण सायली हे विसरली न्हवती.

सायलीच पाहिलं प्रेम तिला आजिबात विसरता येत न्हवत. ते तिला पाहिजे होत, आणि ती त्या साठी स्वतःचा जीव देखील द्यायला तयार होती.

एका बेबी डिलिव्हरी मध्ये मोठया डॉक्टर च्या परवानगी शिवाय तिने त्या महिलेला खूप त्रास होयाला लागला म्हणून स्वतःहून त्या महिलेचे opration केलं, व बाळाला व त्या महिलेला सुखरूप वाचवलं. पण मोठ्या डॉक्टरांच्या आदेश न ऐकल्यामुळे तिला तिची डिग्री गमवावी लागली होती. तिची नोकरी देखील गेली होती. कुटुंबासाठी तिला नोकरी करणे भाग होते.

नवीन नोकरीच्या शोधात असताना तिला एका वेबसाईट वर एका कंपनीमध्ये जागा आहे अस समजत ती पटकन त्या कामासाठी apply करते. मुख्य कार्यालयात मुलाखत देऊन ती त्यात पास देखील झाली. तिला तिच्या घराजवळ म्हणजे ठाणे मधील ऑफिस देतात, हे ऐकून तर ती खूप आनंदी होते, घरापासून जवळ काम असेल तर खूप सोप्प होईल. तिला न्हवत माहीत की ते ऑफिस विनय चे होते.

कामाच्या पहिल्या दिवशी ती खूप आनंदी होती काही तरी नवीन काम करायला मिळेल. अर्धा दिवस काम केल्यावर तिला तिथे विनय दिसतो, तिला अस वाटत हा आपला भ्रम आहे म्हणून ती परत आपल्या कामाला लागते. संध्याकाळी तिला तीच काम तिच्या मॅनेजर पर्यंत पोहचवायच होत, ती मॅनेजर च्या केबिन मध्ये जाते. विनय कामात गुंग होता, सायली विनय ला पाहून भारावून जाते, विनय ला पण तिला बघून काहीच सुचत न्हवते. तिने पुढाकार घेऊन विचारलं तुम्ही इथे? होय मी इथे काम करतो. तो देखील तिला हाच प्रश्न विचारतो तुम्ही इथे? होय! आज पासून मी इथे कामाला लागलेय. ही अशी अचानक झालेली भेट कदाचित देवाच्याच मनात होत आम्ही भेटावं, अस सायली ला वाटू लागले. घरी जाताना सायली खूप आनंदात होती तिला आज सर्व मिळल्यासारखं वाटू लागलं. ह्या उलट विनय ला सायली आपल्या इथे काम करणार ह्याच वाईट वाटत होतं.

असेच थोडे दिवस निघून गेले आणि विनय व सायलीची परत मैत्री झाली. खूप बोलू लागले , सर्व गोष्टी खुळ्यामनाने बोलू लागले. त्याच मध्ये त्यांच्या सर्व गोष्टी एकमेकास समजतात. आणि आवडीनिवडी देखील.
सायलीच्या मनामध्ये वेगळंच चालु होत, तिला विनय च मन जिंकायचं होत, त्या साठी ती धडपड करत होती. मैत्री दिवस जवळ येतंय म्ह्णून ती एक प्लॅन करते. विनय सोबत फिरायला जायच. ती त्या बद्दल विनय ला विचारते, पण विनय नकार देतो, तिला ते आवडलं नाही असं म्हणून ती काही न बोलता निघून जाते. विनय ला वाटत आपल्यामुळे तिला वाईट वाटल म्हणून तो होकार देतो.

मैत्री दिनाच्या दिवशी ते दोघे मुंबई ला फिरायला जातात, मस्त समुद्राच्या किनारी खेळतात, मूवी बघतात, फोटोस काढतात, आणि मग रात्री घरी जातात. तो दिवस दोघांच्या देखील आयुष्यात खूप आनंददायी असतो.

दोघे खूप आनंदी होते. सायली विनय चे फोटोस सारखे सारखे बघत होती. तिला अस वाटत होते विनय देखील आपल्या प्रेमात पडला आहे. आणि  दुसरीकडे विनय देखील सारखा सायलीला आठवत होता आजचा दिवस, तीच बोलणं, तिची मस्ती, आणि सर्व. हा तिच्यात गुंतत होता.
अश्याच प्रकारे एकतर्फी प्रेमाचे मैत्रीत रूपांतर झाले. पुढे लवकरच.........

पुढील भाग " सायलीचा वाढदिवस ; विनय साठी खास " लवकरच

( पुढील भाग लवकरच पोस्ट केला जाईल त्यासाठी आम्हाला फोल्लो करा )
Instagram - https://www.instagram.com/sahebraav291/
Printest -     https://pin.it/7AT1QJ3

( ह्या ब्लॉग चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत , कोणीही परवानगी शिवाय ही कथा वापरू नये )

(All rights reserved to this blog, no one should use this story without permission)

For Permission Contact us : sahebraav291@gmail.com

परवानगी साठी संपर्क करा :  sahebraav291@gmail.com


लेखक ✍️ :  साहेबराव......







  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पहिलं प्रेम - गोड सुरवात की दुःखद आठवणी - भाग १

"ही कथा काल्पनिक आहे , ह्यातून कोणालाही दुखवण्याचा प्रयत्न आम्ही नाही करत , जर यातील पात्र जुळत असतील तर तो योगायोग समजावा".


 

त्या दिवशी सकाळ पासून विनय ची खूप घाई गडबड चालू होती , आई माझं घड्याळ कुठे आहे , माझी गाडी ची चावी कुठे आहे , नुसता आई आई चालू होतं , आई एकदाची वैतागून बोलून गेली मी तुझं आता काहीच ऐकणार नाही , माझं वय झाल्याने मला नाही झेपत एवढी काम तू लवकर लग्न कर आणि बायको आन घरी म्हणजे ती तुझं सर्व ऐकेल आणि मला देखील थोडी मदत करेल . त्यावर विनय जोरात आई वर ओरडला आणि म्हणाला नाही करायचं मला लग्न , मला नकोय माझ्या आयुष्यात कोणी तुमच्या शिवाय , अस बोलून विनय ऑफिस साठी निघाला. आई ला त्याच बोलणे खूप जीवाला लागेल होते पण आई ती आई तिने हसरा चेहरा दाखवून त्याला म्हणली सावकाश गाडी चालव लवकर ये मी वाट बघते.

विनय ला गाडी चालवताना आपण आई वर ओरडलो ह्याच वाईट वाटत होतं , गाडी बाजूला लावून त्याने आईला कॉल केला , काय करतेस ? मगाशी ओरडलो त्या बद्दल सॉरी अस बोलला , त्याला त्याच्या मनावरचं अर्ध ओझ कमी झाल्या सारख वाटलं , आई म्हणली अरे आपल्या लेकरांचं आईला कधीच वाईट नाही वाटत. अश्या गोड संवाद नंतर विनय ऑफिस मध्ये गेला.

28 वर्षाचा विनय खूप दिसायला रूबाबदार आणि ऍक्टिव्ह होता , त्याला खूप लोक चांगलं मानायचे। आणि तो देखील सर्वाना समजून घेणारातल्या होता.
विनय हा Multinational Company चा सिनिअर मॅनेजर होता.

ऑफिस च काम करत असताना त्याला अचानक एक मेल आला तो मेल
Coroprate bussines associaltion तर्फ़े होता , त्या मध्ये अस लिहिलं होतं CBA तर्फे सर्व ऑफिस मुख्य 5 लोकांना गोवा ट्रिप आयोजित केली गेली आहे , त्या साठी फॉर्म होते , नाताळ च्या महिन्यात जर कोणी गोवा ट्रिप आयोजित करत आहे हे ऐकून विनय मनातल्या मनात आनंदी झाला, आणि त्याने स्वतः सोबत 3 स्टाफ च नाव लिहून फॉर्म भरला .
संध्याकाळ झाली विनय गाडी मध्ये गाणे गुणगुणत घरच्या दिशेने निघाला. गोव्याला जाणार ह्या आनंदात विनय घरात खूप मस्ती करण्याच्या मुड मध्ये होता. कधी गोव्याला जाण झालं न्हवत म्हणून हा आनंद होता. स्वतःची बॅग भरत होता आणि "या या माया यो " अस उलट पालट गाणं गुणगुणत होता. 

तो दिवस आला म्हणजे गोव्याला जाण्याचा, आणि आई आणि बाबांच्या पाया पडून तो घरातून निघाला. ठाणे हायवे ला लॅक्सजरी उभी होती. आत बस मध्ये गेल्यावर खूप ओळखीची व अनोळखी माणसे भेटली. टूर गाईड आले आणि म्हणाले आता ऑफिस च काम आणि टेन्शन ऑफिस मध्ये ठेवा आणि ही ट्रिप एन्जॉय करा.

त्याच बस मध्ये विनय ला त्याची बिजनेस  मैत्रीण मिळते म्हणजे कामात त्यांची ओळख झाली होती ह्या पूर्वी. ती तिच्या मैत्रिणी सोबत आली होती. थोडस बोलणे झाल्यावर विनय ची मैत्रीण त्या मुलीची आणि त्यांची ओळख करून देत. अरे हा ही सायली माझी डॉक्टर मैत्रीण आणि आम्ही लहान पणापासून एकत्र आहोत. सायली ही हात पुढे करून विनय ला हॅलो म्हणते.

" सायली ही एका मध्यम कुटुंबातील मुलगी असते ती तिच्या आई बाबा व लहान बहिणी सोबत राहत असते. २४ वर्षाची सायली ही दिसायला खूप सुंदर आणि आवाज देखील गोड होती , प्रेमळ स्वभावाची होती, सायली हिने तीच डॉक्टर च अभ्यास करून ट्रेनिंग पूर्ण करत होती".

योगायोगाने विनय आणि त्याची मैत्रीण व सायली यांची सीट बाजूबाजूला आली. प्रवासाला सुरवात झाली. गप्पा गोष्टी चालू होत्या मात्र सायली ही खूप शांत होती काहीच बोलत न्हवती , जणू ती विनय ला बघून लाजत होती , कदाचित तिच्या मनात विनय बद्दल काही तरी प्रेमळ भावना तयार होत असतील.
गोव्यात पोहचल्यावर सर्व आपआपल्या रूम मध्ये गेले , थोडा वेळ गेल्यांनातर सर्व जण डिनर साठी हॉल मध्ये गेले तर सायली ही थोडी थोडी बोलायला लागली होती , विनय देखील हळू हळू तिच्या सोबत बोलायला लागला, सायली ला काय बोलावे सुचत न्हवते, तर आधी तिने विनय ला त्याचे नाव विचारले, त्यावर विनय हसरा चेहरा करून म्हणाला आपली ओळख झाली ना बस मध्ये, तिने विनय ला विचारले तुम्ही काय काम करता, मी एका Multinational Company  मध्ये सिनिअर मॅनेजर च्या जागी काम करतो, सायली  तुम्ही काय काय करता जॉब वैगरे ती बोलली हो मी माझं शिक्षण पूर्ण करून ट्रेनिंग आणि जॉब पण करते. मी Sexologists व gynecologist आहे. ठाणे मध्ये एका हॉस्पिटल मध्ये काम करते. सायली विनय कडे गोड आवाजात हात पुढे करून  बोलली फ्रेंड्स. विनय ने देखील तिची फ्रेंडशिप स्वीकार केली.
असचे दोन दिवस निघून गेले पूर्ण गोवा फिरण्यात आणि खाणे पिणे, समुद्रावर जाऊन मस्ती करण्यात. विनय देखील खूप आनंदात होता की त्याला एक छान मैत्रीण मिळाली म्हणून.
त्या दिवशी मुंबई साठी परत निघायचे होते, आणि सायली व विनय मध्ये खूप चांगली मैत्री झाली होती, पण सायली ला राहवत न्हवते तिच्या मनात राहून राहून एक विचार येत होता की मुंबई ला गेल्यावर आमचं परत बोलणे होईल की नाही कारण विनय ने तिला त्याचा नंबर दिला न्हवता, म्हणून ती विनय जवळ जाते आणि आणि त्याला बोलते मला तुमच्या जवळ एक महत्वाचा बोलायचं आहे, विनय सहज पणे बोलतो हा बोला मग आता, सायली त्याच्या हातावर एक चिट्टी देऊन निघून जाते. तीच अस वागणं विनय ला आजिबात आवडलं न्हवत, तरी तो ती चिट्टी वाचतो त्या अस लिहिले होते की आज रात्री ८ वाजता हॉटेल च्या गार्डन एरिया मध्ये या मी वाट बघते मला काही तरी सांगायचं आहे.
रात्री चे ८ वाजले आणि विनय गेला, सायली आधीच तिथे आली होती ती खूप घाबरलेली होती काय बोलावं सुचत न्हवत, तरी तिने धीर करून विनय ला म्हणाली मला तुम्ही आवडायला लागला आहात, कदाचित मी तुमच्या प्रेमात पडले, सॉरी मला नाही माहीत तुम्हला आता माझ्याबद्दल काय वाटत असेल, प्लिज मला समजून घ्या. विनय ला हे अपेक्षित न्हवत त्याला खूप वाईट वाटलं होतं त्याला ह्या सर्वात पडायचे न्हवते, तो मनातल्या मनात बोलला की मी ही देखील चांगली मैत्रीण गमावली. तो काहीच न बोलता तिथून निघून गेला.

पुढे लवकरच.........


( पुढील भाग लवकरच पोस्ट केला जाईल त्यासाठी आम्हाला फोल्लो करा )
Instagram - https://www.instagram.com/sahebraav291/
Printest -     https://pin.it/7AT1QJ3

( ह्या ब्लॉग चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत , कोणीही परवानगी शिवाय ही कथा वापरू नये )

(All rights reserved to this blog, no one should use this story without permission)

For Permission Contact us : sahebraav291@gmail.com

परवानगी साठी संपर्क करा :  sahebraav291@gmail.com


लेखक ✍️ :  साहेबराव......



 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS