पहिला भाग वाचा - भाग १
गोव्याला गेल्यावर सायली ने विनय ला प्रेमाची मागणी घातली , विनयला ते आवडलं नाही म्हणून तो तिथून निघून गेला.
सकाळ झाली, सर्व जण बस मध्ये बसून पुन्हा मुंबई कडे रवाना झाले. बस मध्ये बाकी सर्व जण गाण्यांच्या भेंड्या खेळत होते फक्त सायली व विनय सोडून. असच खेळता खेळता सर्व जण सायली ला बोलतात, आता तू गा गाणं, त्यावर सायली पूर्णपणे नकार देते पण सर्वांच्या हट्टामुळे सायली ला 'म' वरून गाणं गायचं असत. सायली खुप विचार करून एक गाणं गायाला तयार होते. प्रेमळ नजरेने विनय कडे पाहत म्हणते " मुझसे मोहब्बत का इज़हार करता ; काश कोई लड़का मुझे प्यार करता ". अस गाणं ऐकल्यावर विनय ला आजून खूप राग येत होता. विनय घरी पोहचला, घरात आधीच त्याची मोठी ताई व तिची मोठी मुलगी आली होती २ दिवसाकरता, विनय च्या मनात सायली बद्दल सारखे विचार येत होते. कदाचित त्याला पण ती आवडते, पण तो तस दाखवत न्हवता. काहीच न बोलता विनय झोपला. सारखा सायली बद्दल मनात मध्ये विचार चालु होते. असे त्याला ह्या आधी खूप purpose आले होते, पण ह्या वेळेस विनयला ह्या सायली बद्दल खूप त्रास होत होता.
सायली चीही परिस्थिती विनय सारखी होती, ती पण खूप शांत शांत होती. जास्त बोलत न्हवती, सारखा विनय बद्दल विचार चालू होता मनामध्ये. पण तिला विनय पाहिजे होता, मनातल्या मनात रडवेली झाली होती.
- बघता बघता ६ महिने निघून गेले होते -
विनय सायली ला पूर्णपणे विसरला होता, पण सायली हे विसरली न्हवती.
सायलीच पाहिलं प्रेम तिला आजिबात विसरता येत न्हवत. ते तिला पाहिजे होत, आणि ती त्या साठी स्वतःचा जीव देखील द्यायला तयार होती.
नवीन नोकरीच्या शोधात असताना तिला एका वेबसाईट वर एका कंपनीमध्ये जागा आहे अस समजत ती पटकन त्या कामासाठी apply करते. मुख्य कार्यालयात मुलाखत देऊन ती त्यात पास देखील झाली. तिला तिच्या घराजवळ म्हणजे ठाणे मधील ऑफिस देतात, हे ऐकून तर ती खूप आनंदी होते, घरापासून जवळ काम असेल तर खूप सोप्प होईल. तिला न्हवत माहीत की ते ऑफिस विनय चे होते.
कामाच्या पहिल्या दिवशी ती खूप आनंदी होती काही तरी नवीन काम करायला मिळेल. अर्धा दिवस काम केल्यावर तिला तिथे विनय दिसतो, तिला अस वाटत हा आपला भ्रम आहे म्हणून ती परत आपल्या कामाला लागते. संध्याकाळी तिला तीच काम तिच्या मॅनेजर पर्यंत पोहचवायच होत, ती मॅनेजर च्या केबिन मध्ये जाते. विनय कामात गुंग होता, सायली विनय ला पाहून भारावून जाते, विनय ला पण तिला बघून काहीच सुचत न्हवते. तिने पुढाकार घेऊन विचारलं तुम्ही इथे? होय मी इथे काम करतो. तो देखील तिला हाच प्रश्न विचारतो तुम्ही इथे? होय! आज पासून मी इथे कामाला लागलेय. ही अशी अचानक झालेली भेट कदाचित देवाच्याच मनात होत आम्ही भेटावं, अस सायली ला वाटू लागले. घरी जाताना सायली खूप आनंदात होती तिला आज सर्व मिळल्यासारखं वाटू लागलं. ह्या उलट विनय ला सायली आपल्या इथे काम करणार ह्याच वाईट वाटत होतं.
सायलीच्या मनामध्ये वेगळंच चालु होत, तिला विनय च मन जिंकायचं होत, त्या साठी ती धडपड करत होती. मैत्री दिवस जवळ येतंय म्ह्णून ती एक प्लॅन करते. विनय सोबत फिरायला जायच. ती त्या बद्दल विनय ला विचारते, पण विनय नकार देतो, तिला ते आवडलं नाही असं म्हणून ती काही न बोलता निघून जाते. विनय ला वाटत आपल्यामुळे तिला वाईट वाटल म्हणून तो होकार देतो.
मैत्री दिनाच्या दिवशी ते दोघे मुंबई ला फिरायला जातात, मस्त समुद्राच्या किनारी खेळतात, मूवी बघतात, फोटोस काढतात, आणि मग रात्री घरी जातात. तो दिवस दोघांच्या देखील आयुष्यात खूप आनंददायी असतो.
दोघे खूप आनंदी होते. सायली विनय चे फोटोस सारखे सारखे बघत होती. तिला अस वाटत होते विनय देखील आपल्या प्रेमात पडला आहे. आणि दुसरीकडे विनय देखील सारखा सायलीला आठवत होता आजचा दिवस, तीच बोलणं, तिची मस्ती, आणि सर्व. हा तिच्यात गुंतत होता.
अश्याच प्रकारे एकतर्फी प्रेमाचे मैत्रीत रूपांतर झाले. पुढे लवकरच.........
पुढील भाग " सायलीचा वाढदिवस ; विनय साठी खास " लवकरच
( पुढील भाग लवकरच पोस्ट केला जाईल त्यासाठी आम्हाला फोल्लो करा )
Instagram - https://www.instagram.com/sahebraav291/
Printest - https://pin.it/7AT1QJ3
( ह्या ब्लॉग चे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत , कोणीही परवानगी शिवाय ही कथा वापरू नये )
(All rights reserved to this blog, no one should use this story without permission)
For Permission Contact us : sahebraav291@gmail.com
परवानगी साठी संपर्क करा : sahebraav291@gmail.com
लेखक ✍️ : साहेबराव......







0 comments:
टिप्पणी पोस्ट करा